breaking-newsमुंबई

धारावीतून ‘प्लाझ्मा दान संकल्प’ अभियानाचा प्रारंभ

मुंबई : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस दक्षिण -मध्य मुंबईत ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या अभियानाच्या माध्यमातून, कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेले मुंबईकर प्लाझ्मा दान करणार असून याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.

कोरोनावर मात करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्माचा (रक्तद्रव) वापर कोरोनावरील उपचारासाठी यशस्वीरीत्या केला जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मा दान करणारे यात असलेली मोठी तफावत कमी करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’ आयोजित करण्यात केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात धारावीतून होणार आहे. कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेले धारावीकर, डॉक्टर्स, पोलीस आणि पदाधिकारी पहिल्या दिवशी आपला प्लाझ्मा दान करणार आहेत. त्यानंतर आठवडाभरात दादर- माहीम, वडाळा, सायन-कोळीवाडा, चेंबूर, अणुशक्तीनगर या दक्षिण- मध्य मुंबईतील इतर विधानसभाक्षेत्रात हे अभियान राबविले जाणार आहे. तसेच या दरम्यान, ‘प्लाझ्मा दाना’बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button