breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर आज  पुन्हा एकदा दरड कोसळली आहे. डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ठाकूरवाडी ते मंकीहिल दरम्यान सव्वा तीनच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे ठिकठिकाणी थांबल्या असल्याची लोहमार्ग प्रशासनाची माहिती दिली आहे. तर अन्य सर्व गाड्या कर्जत स्टेशनवर थांबवल्या असल्याची माहिती आहे.

ANI

@ANI

Maharashtra: Train movement on Mumbai-Pune line on Central Railway route affected after a boulder fell on the down line between Thakurwadi-Monkey Hill at 1515 hours. Down line and Middle line affected.

१६ लोक याविषयी बोलत आहेत

महिनाभरात चार वेळा रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे.  या घटनेमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तर दरड कोसळली त्या ठिकाणी रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी काम करत असलेला कर्मचारी या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे. या अगोदर ५ जुलै रोजी दरड कोसळण्याची घटना घडली होती.

अंदाजे अडीच वाजेच्या सुमारास डाउन लाईन – किमी. ११७ मध्ये छोटे दगड पडले होते. दगड छोटे असल्या कारणाने तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते तत्काळ हटवले व मार्ग मोकळा करू दिला. यानंतर या मार्गावरून दोन एक्सप्रेस देखील गेल्या. मात्र, सततच्या पावसामुळे पुन्हा एकदा भला मोठा दगड तीन  वाजेच्या सुमारास डाउन आणी मिडल लाईनच्या किमी. ११५ मध्ये पडला व दोन्ही लाईन बंद झाल्या. दगड मोठा असल्यामुळे स्फोट घडवून मार्ग मोकळा करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button