breaking-newsपुणे

धायरीत गाड्यांची तोडफोड, दहशतीचे वातावरण

पुणे |महाईन्यूज|

धायरी येथील धारेश्वर मंदिराच्या परिसरात रात्री दीडच्या सुमारास दहा ते बारा गाड्यांची कोयत्याने तोडफोड करण्यात आली. यामध्ये चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसापासून शहरात सुरु असलेले वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. कोणी दारूच्या नशेत गाडीची तोडफोड करतोय तर कोणी दहशत निर्माण करण्यासाठी वाहने फोडतोय.

मात्र, या सर्व प्रकारात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button