breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात स्थायी समिती सभापती पदी हेमंत रासने यांचा दुसऱ्यांदा विजय

पुणे |महाईन्यूज|

महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची बहुमताने निवड करण्यात आली. रासने यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या महेंद्र पठारे यांचा सहा विरुद्ध दहा असा पराभव केला. रासने यांच्या गळ्यात सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ पडली आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत संपल्याने यावर्षीच्या (२०२०-२१) अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य आहे. भाजपाकडे स्पष्ट बहूमत असल्याने त्यांचा विजय निश्चित होता. अर्ज मागे घेण्याकरिता १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता.

आधी पठारे यांच्याकरिता मतदान घेण्यात आले. त्यांच्याबाजूने महाविकास आघाडीची सहा मते पडली. तर रासने यांच्या बाजूने दहा मते पडली. बहुमत रासने यांच्या बाजूने असल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी विजयी घोषित केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजपाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button