breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! मुंबई मध्ये मनीष कमर्शिअल सेंटर मध्ये सिलेंडरचा स्फोट; एक महिला जखमी

मुंबई: आज मुंबई मध्ये आज वरळीच्या जुन्या पासपोर्ट इमारतीतील तिस-या मजल्यावरच्या केमिकल लॅबमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ही इमारत Manish Commercial Centre आहे. स्फोटाच्या मोठ्या आवाजानं वरळीत Annie Besant Road वर राहणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेले होते. अपघाताची ही घटना सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

या अपघातामध्ये सुचिता रश्मी कौर ही 30 वर्षीय महिला जखमी झालेली आहे. तिच्या डाव्या पायाला आणि डोक्याला किरकोळ जखम झालेली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिलेला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात फारशी लोकं नसल्याने मोठा अनर्थ टळलेला आहे. यामध्ये अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. मात्र रस्त्यावर खिडकीच्या काच्या फुटून विखुरल्या आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हा स्फोट 250 लीटरच्या Liquid Nitrogen Cylinder चा झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच 1 फायर इंजिन आणि 1 अ‍ॅम्ब्युलंस दाखल झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button