breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अजितदादांची सकाळी ६ वाजता पुण्यात मेट्रो सवारी

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. आजही त्याचा प्रत्यय आला. आज भल्या पहाटे त्यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. पुण्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महा मेट्रोकडून सुरू आहे. यातील पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी अजित पवार यांनी केली. त्यासाठी सकाळी सहा वाजता ते फुगेवाडी स्थानकावर पोहोचले होते.

अजित पवारांनी पहाटे पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्यानंतर मेट्रो संदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे वळला. या स्थानकाची पाहणी करत अजितदादांनी स्थानकावर तिकीट विक्री कशी असेल, याचीही माहिती घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगरला मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन त्यांनी मेट्रो प्रवास केला. अजित पवार मेट्रोचालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. या पाहणी दौऱ्यात काही पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button