breaking-newsक्रिडा

टाटा टेक्‍नोलॅजीज्‌, कॅपजेमिनी संघांचा विजय

पुणे – टाटा टेक्‍नोलॅजीस संघाने सिनरझीप संघाचा तर कॅपजेमिनी संघाने आयबीएम संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

लिजेंडस्‌ क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत स्वप्निल मुंगेलच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर टाटा टेक्‍नोलॅजीज्‌ संघाने सिनरझीप संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना विण पाळंदे, स्वप्निल मुंगेल व अक्षय ताम्हाणे यांच्या अचूक गोलंदाजीपुढे सिनरझीप संघ केवळ 17.3 षटकांत सर्वबाद 70 धावांमध्येच गारद झाला.

70 धावांचे लक्ष स्वप्निल मुंगेलच्या नाबाद 21 धावांसह टाटा टेक्‍नोलॅजीस संघाने केवळ 11.4 षटकांत 3 बाद 72 धावा करून सहज पुर्ण केले. तर, दुसऱ्या लढतीत कॅपजेमिनि संघाने आयबीएम संघाचा 6 गडी राखून पराभव केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button