breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक! तुंगार्ली धरणात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनी सापडला मृतदेह

लोणावळा: सोमवारी आपले तीन भाऊ आणि इतर चार मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेला वसई, मुंबई येथील एक युवक तुंगार्ली धरणात बुडाला होता. शिवदुर्ग मित्र लोणावळा व एनडीआरएफच्या टिमने आज बुधवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास सदर युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सोमवारी दुपारी घटना घडल्यापासून शिवदुर्ग मित्र बचाव पथकाकडून या युवकाचा शोध सुरू होता. अमित देवीदिन गुप्ता (वय २३, रा. शांतीनगर, तुंगार फाटा, वसई) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

अमित याचा भाऊ अजय गुप्ता (वय २९) याने दिलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी सुट्टी असल्याने ते चार भाऊ आणि इतर चार मित्र असे एकूण ८ जण लोणावळा शहरात फिरण्यासाठी आले होते. येथून ते राजमाची किल्ल्यावर जाणार होते. मात्र रस्त्यात तुंगार्ली धरण लागल्याने हे सर्व मित्र या ठिकाणी थांबले होते. दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अमित आणि आणखी एक जण धरणाच्या पाण्यात उतरले असता अमित हा पाण्यात बुडू लागला. इतरांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आलेले आहे.

शिवदुर्ग टिमने तीन दिवस शोध मोहिम राबवलेली आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पवन तायडे आणि शिवदुर्ग बचाव पथकाचे केदार देवळे, सागर कुंभार, प्रविण देशमुख, अजय शेलार, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, दुर्वेश साठे, सतिष मेलगाडे, अशोक उंबरे, अभिषेक गायकवाड, राजेंद्र कडु, पुनिकेत गायकवाड, सारंग गायकवाड, विकास मावकर ,राजु पाटील, सुनिल गायकवाड भगवान घनवट, अनिल सुतार, आनंद गावडे, अनिल आंद्रे, चंद्रकात बोंबले यांच्यासह एनडीआरएफ टिमने आज ही शोध मोहिम राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button