breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

उर्फीबाबतच्या वक्तव्याने हनी सिंग होतोय ट्रोल; म्हणाला ही मुलगी प्रचंड

मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री उऱ्फी जावेद तिच्या चित्र विचित्र फॅशन कपड्यामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपासुन उर्फी चित्रा वाघ यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. या वादात अनेक नेत्यानी हस्तक्षेप केला आहे. महाला आयोगानेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता बॉलिवूडचा सिंगर हनी सिंगनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवुड सिंगर हनी सिंगने एका मुलाखतीत उर्फीचे कौतुक केले आहे. भविष्यात आपल्याला उर्फीसोबत काम करायला देखील आवडेल असंही त्याने म्हटले आहे. हनी सिंगच्या या वक्तव्यामुळे त्याला चांगलच सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
मला ही मुलगी प्रचंड आवडते. ती प्रचंड बोल्ड आणि धाडसी आहे. स्वतःचं आयुष्य ती स्वतःच्या अटींवर जगते. देशातील सगळ्या मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं, असं हनी सिंगने उर्फीबाबत म्हटलं आहे.

भविष्यात उर्फीबरोबर काम करण्याबाबत हनी सिंगने होकार दिला आहे. नक्कीच जर मला एखादं गाणं मिळालं ज्यामध्ये ती उत्तम काम करू शकेल मी जरूर तिच्याबरोबर काम करेन. माझ्याकडून तिला भरपूर शुभेच्छा आणि पाठिंबा, असंही हनी सिंग म्हणाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button