breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने खडेबोल सुनावल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १३ ऑक्टोबररोजी सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता अलीकडे घेण्यात आली असून १३ एवजी १२ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, १२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे नवीन वेळापत्रक ईमेल द्वारे शिंदे गट व ठाकरे गटाला पाठवण्यात आले आहे. जी-२० संदर्भात १३ ऑक्टोबरला दिल्लीत बैठक होत आहे. बैठकीत राज्यातील महत्त्वाचे नेते, अधिकारी जाणार असल्याने सर्वांच्या सोईसाठी आता सुनावणी एक दिवस आधी ठेवल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – World Cup 2023 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान आमने-सामने

राहुल नार्वेकर म्हणाले, १३ ऑक्टोबर रोजी मला दिल्लीतील एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे. मी या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी १३ तारखेची सुनावणी १२ तारखेला घेत आहे. मला यात कोणतीही दिरंगाई करायची नाहीये. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी एक दिवस आधी सुनावणी घेणार आहे.

जर मला दिरंगाईच करायची असती, तर या कारणास्तव मी ती पुढे ढकलू शकलो असतो. पण मी तर एक दिवस आधी सुनावणी घेतोय. माझ्यावर होणाऱ्या आरोपांमागचा हेतू मला माहिती आहे. पण यामुळे माझ्या निर्णयप्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कदाचित या या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा असेल. पण याचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडू शकत नाही. नियमानुसार मी माझा निर्णय घेईन, असही राहुल नार्वेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button