breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

धक्कादायक! ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्रीची गळफास लावून आत्महत्या

छोट्या पडद्यावरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री तिने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काम बंद असल्यामुळे प्रेक्षा नैराश्यामध्ये गेल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेक्षाने सोशल मीडियावर निराशाजनक पोस्ट लिहिली होती.

लॉकडाउनमुळे प्रेक्षा मुंबईहून इंदौरला गेली. तिने इंदौरमधील बजरंग नगर येथील तिच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. अद्याप तिच्या आत्महत्येमागचे कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षा गेल्या काही दिवासांपासून तणावग्रस्त होती.

प्रेक्षा मुंबईहून घरी परतल्यानंतर काही दिवस नैराश्यामध्ये होती. सोमवारी रात्री प्रेक्षा रुममध्ये गेली तेव्हा काही वेळ तिचा फोन वापरत होती. त्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर निराशाजनक एक स्टेटस पोस्ट केला. या पोस्टमध्ये तिने, ‘सर्वात वाईट असतं ते म्हणजे तुमची स्वप्न मरुन जाणं’ असे लिहिले होते. सकाळी जेव्हा तिचे वडिल उठले तेव्हा त्यांनी प्रेक्षाने आत्महत्या केल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रेक्षाला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिचे निधन झाल्याचे सांगितले.

अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्न उराशी बाळगून प्रेक्षा मुंबईत आली होती. पण मुंबईमध्ये करोनाचा वाढता संसर्ग पाहता आणि लॉकडाउन पाहता तिने आई- वडिलांकडे इंदौरला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून तिला काम मिळत नसल्यामुळे ती नैराश्याचा सामना करत होती. आणि नैराश्यामध्येच तिने हे पाऊल उचलले असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button