breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिकारी संभाजी ऐवले यांच्या पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची शिफारस

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री बच्चू कडू यांची मध्यस्ती
  • दिव्यांगांच्या संघटनांनी सुध्दा घेतला पुढाकार

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या पदोन्नतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी फिल्डींग लावली आहे. महापालिका ठराव क्रमांक 913, 499, 578 नुसार मंजूर सहायक आयुक्त (सामुहिक विकास), सहायक आयुक्त (दिव्यांग कक्ष) आणि मुख्य समाजविकास अधिकारी या पदांपैकी कोणत्याही एका पदावर पदोन्नतीसाठी शिफारस करण्याची मागणी ऐवले यांनी केली होती. त्यानुसार सर्वपक्षीय नेत्यांनी ऐवले यांच्या पदोन्नतीसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे शिफारस केली आहे.

अधिकारी ऐवले यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना महापालिका सभेत मंजूर झालेल्या ठरावाची माहिती दिली. त्यानुसार पात्र असून पदोन्नती मिळत नसल्याची कैफीयत मांडली. त्यावर खासदार बारणे यांनी आयुक्त हर्डीकर यांना त्यांच्या पदोन्नतीचा आदेश काढण्याच्या सूचना केल्या. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याशी देखील ऐवले यांनी पत्रव्यवहार केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, नगरसेविका करुणा चिंचवडे, पक्षनेते नामदेव ढाके, मीज उपमहापौर तुषार हिंगे, पत्रकार विनोद चांदमारे यांना मागणीचे निवेदन दिले आहे. या सर्वांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, आयुक्त हर्डीकर यांनी आजपर्यंत करू, करतो, फाईल प्रोसेसमध्ये आहे, अशी उत्तरे दिल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात आजअखेर त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.

याशिवाय, ऐवले यांनी आयुक्त हर्डीकर यांना स्वतः याच्यासंदर्भात चर्चा केली आहे. लेखी अर्ज केले आहेत. त्यावर पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. 5 जानेवारी 2021 रोजीच्या डीपीसीत पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्याचा शब्द देखील आयुक्तांनी दिला होता. खासदार बारणे यांनी स्वतः भ्रमणध्वणीवरून संपर्क साधून आयुक्तांशी यासंदर्भात सूचना केल्या होत्या. राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन ऐवले यांनी वस्तुस्थिती समोर मांडली होती. त्यावर कडू यांनी देखील तत्काळ आयुक्तांना मोबाईलद्वारे संपर्क साधून यासंदर्भात सूचना केल्या होत्या. सांगोल्याचे आमदार शहाजी राजाराम भोसले पाटील यांच्याकडे देखील ऐवले यांनी ही तक्रार केली होती. प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उडान दिव्यांग संस्थेचे शहराध्यक्ष आनंद बनसोडे यांनी पदोन्नतीसाठी मध्यस्ती करावी, अशी मागणी ऐवले यांनी केली होती. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांसह, दिव्यांगांच्या संघटनांनी सुध्दा आयुक्तांकडे ऐवले यांच्या पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button