फेसबुकचे मोठे पाऊल; २०० पेक्षा अधिक अॅप्स कायमचे हटवले
कॅलिफोर्निया : डेटा लिक प्रकरणी अडचणीत सापडलेल्या फेसबुक या सोशल मीडिया व्यवस्थापनाने मोठी कारवाई केली आहे. फेसबुक युजर्सचा डेटा लिक करण्याच्या संशयावरून आतापर्यंत २०० हुन अधिक अॅप्स वर कारवाई केली असून त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आले आहे. तसेच आणखी काही अॅप्सची चौकशी सुरु असून त्यामध्ये देखील आढळ्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे निर्देश फेसबुकने दिले आहेत.
गेल्या तीन महिन्यांच्या काळामध्ये फेसबुकने एकूण ५८३ मिलियन म्हणजे ५८.३ कोटी फेक अकाउंट्स बंद करण्यात आल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे. तसेच आपल्या ग्राहकांसाठीच्या नियमावालीमध्ये काही नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे फेसबुक प्रत्येक वर्षी दोन वेळा ट्रॅन्स्फरन्सी रिपोर्ट प्रकाशित करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आपली सुरक्षा आणि फेसबुकच्या कार्याविषयी अधिक माहिती मिळणार आहे.