breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू-तळवडे रस्ता भुसंपादन करून पालिकेला द्यावा 

रस्ता बाधितांची महापौरांसमवेत महापालिकेत बैठक

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  देहुगाव येथील मुख्य कमान ते तळवडे हा देहु-आळंदी मार्गावरील तीन किमी. रस्ता अनेक वर्षे रखडलेला आहे. त्या संदर्भात महापौर राहूल जाधव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत बाधित शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभागाने भुसंपदनाची कार्यवाही पूर्ण करून रस्ता महापालिकेला द्यावा, असे महापालिकेने सूचविले आहे. त्यानंतर महापालिका तो चांगल्याप्रकारे विकसित करून देईल, अशी ग्वाही महापौर जाधव यांनी दिली.

महापौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार महेश लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, देहुच्या सरपंच उषा चव्हाण आदी उपस्थित होते. भूसंपादनाच्या अभावामुळे लालफितीत अडकल्याने महापालिकेला दरवर्षी ६० लाख रुपये दुरुस्तीसाठी मोजावे लागतात. त्यामुळे या रोडचे भूसंपादन सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे बाकी रोड महापालिका बांधेल, अशी मागणी महापालिकेच्या वतीने सार्वजनीक बांधकाम विभागाला करण्यात आली.

गावक-यांनी बाधीत क्षेत्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोबदला मागितला. सार्वजनीक बांधकाम विभागानेही लवकरच भूसंपादन केले जाईल, अशी ग्वाही महापालिकेला दिली आहे. तसेच, या संदर्भात महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेतकरी यांची आणखी एक संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

देहू तिर्थक्षेत्रासाठी येणाऱ्या भांवीकांची गैरसौय होऊ नये. यासाठी पालिका हा रस्ता करण्यास तयार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी लागणारे भूसंपादन करावे. तसेच, मोबदला द्यावा व जागा महापालिकेला हस्तांरीत करावी. त्यानुसार महापालिका नियमानुसार रस्ता बांधून देईल.
– राहूल जाधव, महापौर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button