breaking-newsपिंपरी / चिंचवड

रक्षा बंधन नव्हे -सुरक्षा बंधन – उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील 

– पिंपरी आरटीआे कार्यालयात रक्षा बंधनासोबत सुरक्षा बंधनाची शपथ 
पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात घरकाम महिला सभा वतीने रक्षा बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी धुणी-भांडी, स्वयंपाक,साफसफाई कामगार महिलांनी आर.टी.ओ.अधिकारी आणि कर्मचारी यांनी राखी बांधून रक्षा बंधन कार्यक्रम साजरा केला.  तसेच आर टी ओ अधिकारी यांनी वाहतूक नियम पाळण्याची पट्टी महिलांना बांधली, तसेच सुरक्षा नियम पाळण्याची शपथ घेण्यात आली.
घरकाम महिला सभेच्या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील म्हणाले की, हा रक्षा बंधन नसून सुरक्षा बंधन आहे. रस्ते सुरक्षा नियम न पाळल्यामुळे अपघात होत आहेत, महिलांनी ठरवले तर अपघातास आळा बसू शकतो.  आपली वाहने चालविताना सुरक्षेची काळजी घेवून वाहतूक नियम प्रत्येकाने पाळावेत, जेणे करुन अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, घरकाम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर , मोटार वाहन निरीक्षक रघुनाथ कन्हेरकर , चंद्रकांत जावळकर , सचिन विधाते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संदीप गोसावी , दत्तात्रय सनगर, अर्चना घाणेगांवकर आदी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button