breaking-newsराष्ट्रिय

‘देशविघातक कृत्यांचा आरोप असलेले PFIचे नेते आप, काँग्रेसच्या संपर्कात’

नवी दिल्ली | सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशासह इतर राज्यांत झालेल्या हिंसाचारामागे ज्यांचा हात असल्याचा संशय आहे, त्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मुख्यालय दिल्लीत शाहिन बाग परिसरातच आहे. विविध देशविघातक कृत्ये करण्यासाठी याच संघटनेकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ED) या संदर्भात केलेल्या तपासातून पुढे आली आहे.

याच विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून या संघटनेच्या विविध आर्थिक व्यवहारांची तपासणी सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू आहे.

सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे दिल्ली विभागाचे प्रमुख मोहम्मद परवेझ अहमद हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि काँग्रेस नेते उदीत राज यांच्यासह या दोन्ही पक्षांच्या इतर नेत्यांच्या संपर्कात आहेत.

दिल्ली विधानसभेसाठी येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराची आजच सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाची माहिती महत्त्वाची मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button