breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचा शाळा भेट उपक्रम

पुणे । प्रतिनिधी

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलमध्ये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागा तर्फे 20 जानेवारी रोजी शाळा भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, वरीष्ठ तंत्रज्ञ आशुतोष पाटील, उपशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ, जिल्हा परिषद विस्तार अधिकारी जयश्री प्रकाश दोंदे, विस्तार अधिकारी मंगल गोतारणे उपस्थित होते.

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव इरफान शेख, मुख्याध्यापक परवीन शेख यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेत वर्षभर होत असलेल्या मराठी विषयाच्या उपक्रमाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. क्षीरसागर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती संबंधी व एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button