breaking-newsमराठवाडा

नगरमध्ये कंगनाचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; शिवसेनेचा इशारा

नगर – अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. नगरमध्ये शिवसेनेने आज कंगनाचा फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत आंदोलन केले. तसेच हा फ्लेक्स जाळून टाकत तिच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यापुढे कंगना राणावतचा कुठलाही चित्रपट नगरमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने यावेळी दिला. त्यामुळे कंगनाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचलेला असतानाच कंगनाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल रात्री नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकारी व नगरसेवक यांनी एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून कंगनाचा निषेध करताना तिच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. तर आज पुन्हा चितळे रोडवरील नेताजी सुभाष चौकात कंगना राणावतचा फोटो असलेल्या फ्लेक्सला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. तसेच हा फ्लेक्स जाळण्यात आला. यावेळी कंगनाच्या विरोधात जोरदार घोषणा करण्यात आली. तसेच इथून पुढे कंगनाचा कुठलाही चित्रपट नगरला प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button