breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुधाच्या वाढीव खरेदी दरामुळे दुग्धजन्य पदार्थांचेही दर वधारले, ताक थेट आठ रुपये लिटरने महागले

जळगाव | दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने जिल्हा दूध संघातर्फे दुधाच्या किंमतीपाठोपाठ इतर दुग्धजन्य पदार्थांच्याही किंमती वाढविल्याने ताकाच्या दरात थेट आठ रुपये प्रती लिटरने तर तुपाचे दर ५० रुपये प्रती किलोने वाढले आहे. त्यात आता गुजरातच्या दूध संघांकडून स्पर्धा वाढत असल्याने भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्हा दूध संघाच्यावतीने डिसेंबर २०१९पूर्वीच दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केली तरी इतर दुग्धजन्य पदार्थांचे दर ‘जैसे थे’ होते. मात्र दूध उत्पादकांना वाढीव खरेदी दर द्यावे लागत असल्याने उत्पादनाची तुलना पाहता दूध संघाचे उत्पन्न त्या प्रमाणात येत नसल्याने अखेर दूध संघाने इतरही दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीत वाढ केली आहे.
यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून २०रुपये लिटरवर असलेल्या ताकाचे दर थेट आठ रुपये लिटरने वधारुन ते २८ रुपये लिटर झाले आहे.

अशाच प्रकारे मसाला ताकाचेही दर पाच रुपये प्रती पाऊचवरून आठ रुपये प्रती पाऊच झाले आहे. सर्वात जास्त वाढ म्हणजे तुपामध्ये झाली आहे. तुपाचे दर थेट ५० रुपये किलोने वधारले आहे.
उन्हाळ््यामध्ये दुधाचे उत्पादन कमी होऊन आवक मोठ्या प्रमाणात घटते. त्यानुसार दरवर्षी खरेदी दर वाढवून द्यावे लागतात. यंदाही तीच स्थिती आहे. मात्र याचा बोझा आता थेट ग्राहकांच्या खिशावर येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button