breaking-news

बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या! प्रवीण तोगडियांची मागणी

नागपुर | महाईन्यूज

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी आता हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अयोध्येतील राम मंदिर उभारणीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली.

त्यानंतर काही वेळातच राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी प्रवीण तोगडियांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग होता अशा चारजणांचा गौरव केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन करावा असंही त्यांनी म्हटलं आहे. नागपुरातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button