breaking-newsताज्या घडामोडी

३२ हजार स्टेशन मास्तरांना ५४०० ग्रेड पे मिळणार

सोलापूर | भारतीय रेल्वे खात्यातील मध्य, साऊथ, ईस्ट व नॉर्थ अशा ३२ हजार स्टेशन मास्टर्सना ५ हजार ४०० रुपये ग्रेड पे (वेतनश्रेणी) वाढविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे़ याबाबतचा आदेश रेल्वे मंत्रालयात आयोजित बैठकीनंतर २५ फेबु्रवारी दुपारी २ वाजता काढण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे केंद्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रय व सोलापूर मंडलाध्यक्ष संजीव अर्धापुरे यांनी ‘एका मराठी वृत्ता’ला दिली आहे.

अखिल भारतीय स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतीय रेल्वे खात्यात असलेल्या सर्वच स्टेशन मास्तरांची वेतनश्रेणी वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती़ या मागणीच्या पूर्ततेसाठी स्टेशन मास्तर संघटनेने वर्षानुवर्षे विविध प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाने लक्ष वेधले़ मागणी मान्य होत नसल्याने स्टेशन मास्टर्स असोसिएशनने २५ फेबु्रवारी रोजी दिल्ली येथै महारॅलीचे आयोजन केले होते़ या रॅलीत रेल्वेतील १० हजार स्टेशन मास्टर्स सहभागी झाले होते.

दरम्यान, दिल्ली येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आल्यामुळे रेल्वे मंत्रालय परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले होते़ त्यामुळे पोलिसांनी महारॅली काढू दिली नाही़ महारॅलीत सहभागी झालेल्या स्टेशन मास्टर्स यांचा रोष लक्षात घेता रेल्वे मंत्रालयातील उपमुख्य निदेशक (पे कमिशन) वित्त आयोगाचे सुधा ए़ कुजर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़ या बैठकीत भारतीय रेल्वेतील स्टेशन मास्टर्स यांना ५ हजार ४०० गे्रड पे (वेतनश्रेणी) वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याबाबतचा आदेश तत्काळ काढण्यात आला.

यावेळी भारतीय रेल्वे स्टेशन मास्टर्स असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रय, सहसचिव पी़ सुनीलकुमार, आऱ डी़ स्वामी, झोन वित्त सचिव डी़ के़ अरोरा, सोलापूर मंडल अध्यक्ष संजीव अर्धापुरे, सचिव एस़ एऩ सिंग, मोनीकुमारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button