breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंद्र सरकारच्या विरोधात पिंपरीत कॉंग्रेसचे उद्या आंदोलन


पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शेतक-यांना उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा. हुकूमशाहीकडे वाटचाल करणा-या व भांडवलदारांना अनुकूल कायदे करणा-या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. 2 ऑक्टोबर) सकाळी 10:30 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेतील पिढीत तरुणीस श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती कॉंगेसकडून कळविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button