breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकी चालवण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना; आधी वाचा मगच बाईकवर बसा!

मुंबई | प्रतिनिधी

केंद्र सरकार वाढते दुचाकीचे अपघात लक्षात घेता दर वेळेस वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करत असते. त्यामध्ये सुरक्षितता महत्त्वाची असते त्यामुळे काही नियम बदलले जातात. दरम्यान, सरकारने दुचाकी चालवणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

मागील महिन्यातच एका मार्गदर्शक सुचनेत सांगितले होते की, दुचाकीच्या दोन्ही बाजूस ड्रायव्हरच्या सीटच्या मागे हॅन्ड होल्ड असणे आवश्यक आहे. मागे बसणाऱ्या लोकांना संरक्षण देणे हा यामागचा हेतू आहे. सध्या बऱ्याच बाईक्समध्ये ही सुविधा आहे.

दुचाकीच्या दोन्ही बाजूस पायदान असणे आवश्यक आहे. तसेच मार्गदर्शक सुचनांमध्ये लिहिले आहे की, दुचाकीच्या मागील बाजूस चाकाच्या डाव्या साईडला कमीतकमी अर्धा भाग सुरक्षितपणे झाकलेला असावा जेणेकरून मागे बसलेल्या लोकांचे कपडे किंवा बायकांच्या ओढण्या चाकात अडकू नयेत.

दुचाकीवर हलके कंटेनर ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. कंटेनेरची लांबी ५५० मिमी, रुंदी ५१० मिली आणि उंची ५०० मिमिपेक्षा जास्त नसावी. मागील सीटवर जर कंटेनर ठेवला असेल तर फक्त चालकालाच मान्यता देण्यात येईल. दुसरा व्यक्ती दुचाकीवर बसू शकणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button