breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात गेल्या 24 तासांमध्ये 7466 नवीन रुग्ण, 175 लोकांचा मृत्यू 

नवी दिल्ली | देशभरातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांच्या आत कोरोनाचे 7 हजार 466 नवीन केस समोर आले आहेत. तर 175 लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाकडून रिपोर्ट जारी करण्यात आला. आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार झाली आहे.  कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजार 706 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 4 हजार लोक बरे झाले आहेत.

आता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 71 हजार 106 एवढी झाली आहे. आता देशात एकूण अॅक्टिव्ह केसेसची संख्या ही 90 हजार आहे.महाराष्ट्रात कोरोनाच्या एकूण रुग्णांचा आकडा 60 हजारच्या जवळपास आहे. सध्या येथे 59 हजार 549 रुग्ण आहेत. यामधील 1982 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. येथे 19 हजार 372 नवीन रुग्ण समोर आले आहेत. यामधील 145 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button