breaking-newsमनोरंजन

फसलेली ‘रेस’

अभिनेता सलमान खान आणि ईद हे समीकरण त्याच्या चाहत्यांसाठी आणि बॉलीवूड साठी सुद्धा खास असते. यंदाही सलमान खान एक धमाकेदार सिंनेमा घेउन आला, हा ‘रेस’ सिरीज मधला तिसरा भाग अर्थात ‘रेस ३’ सर्वांची निराशा करणारा ठरला आहे.
‘रेस 3’ चित्रपटाची कथा शमशेर (अनिल कपूर) पासून सुरु होते. शमशेर हा आयलँड अल शिफामध्ये अवैध पध्दतीने हत्यार सप्लाय करण्याचे काम करतो. भारतात हा व्यवसाय सुरु करणे हे शमशेरचे स्वप्न असते. परंतू त्याच्या क्रिमिनल रेकॉर्डमुळे तो असे करु शकत नाही. राणा(फ्रेडी दारुवाला) शमशेरचा प्रतिस्पर्धी आहे. बिझनेमुळे दोघांमध्ये अनेक वेळा खटके उडत असतात. तर सिकंदर(सलमान खान) हा शमशेरचा सावत्र मुलगा आहे. शमशेरला संजना (डेजी शाह) आणि सूरज(शाकिब सलीम) हे अजून दोन मुलं आहेत. हे तिघेही शमशेरसोबत काम करत असतात. यश (बॉबी देओल) सिकंदरचा बॉडी गार्ड आहे. जैसिका (जॅकलीन फर्नांडिज) सिकंदरची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. पुढे काय घडते यासाठी ‘रेस ३’ बघायलाच हवा असे काही नाही.
दिग्दर्शक  रेमो डिसूजाच्या ‘रेस ३’ या सिनेमाची कथा म्हणजे अगदीच काही म्हणजे काहीच कळत नाही. या सिनेमात काय आहे यापेक्षाही या सिनेमात काय नाही या बाबीचा जास्त विचार करावा लागेल. हा सिनेमा. आधीच्या दोन्ही सिनेमांतला पॅटर्न तसाचा तसा घेऊन त्यात नवीन पात्र, नवीन वातावरण आणि या सगळ्याची नवी संरचना करून मांडली की, रेसचा आणखी एक नमुना तयार होईल असा निर्मात्यांचा विचार असेल. ‘तुम दिल से नही डेल पुछो..’ सारखे अत्यंत दयनीय विनोद आणि अतिशय फुटकळ क्लायमॅक्स यांनी सजलेला हा सिनेमा प्रभाव पाडायला शंभर टक्के निकामी ठरतो. सगळं संपलं तरीही या सिनेमाची कथा काय आहे हे एक सलगपणे अजिबात सांगता येत नाही. या  सिनेमात अति चकचक यापलीकडे काहीही नाही.
दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणावं तर भारी भारी दृष्यं एकत्र जोडल्याने कधीही सिनेमा तयार होऊ शकत नाही. सिनेमाला गरज असते ती कथेची आणि कथाच नसेल तर सिनेमा प्रेक्षकाला खिळवून ठेवूच शकत नाही आणि कितीही मोठे स्टार किंवा कितीही बडी लोकेशन्स, गाड्या आणि इतर सगळं आणलं तरी तो सिनेमा वाचू शकत नाही.
कलाकारांच्या अभिनय बद्दल सांगायचे तर अनिल कपूर पडद्यावर नेहमीच छान वाटतो, पण त्याच्या इतर सिनेमांसारखा मोकळेपणा यात कुठेच नाही. सलमानचा करिश्मा या रेस मध्ये दिसतच नाही. बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शहा या महान कलाकरांबद्दल सांगायचं तर एकच सलमान रोजगार हमी योजने मधून लागलेली वर्णी.
गाण्यांना आणि गाण्यांच्या शब्दांनाही काहीही अर्थ नाही. या सिनेमाची लोकेशन्स खरोखरच देखणी आहेत. मात्र. सिनेमा प्रेक्षकाला गुंतवून ठेवायला अपयशी ठरतो तुम्ही सलमानचे कितीही मोठे चाहते असलात तरी हा सिनेमा ‘ट्यूबलाईट’ च्या खालची पायरी आहे हे लक्षात घ्या बाकी निर्णय तुमचा.
चित्रपट  -रेस ३
निर्माता -रमेश तौरानी, सलमान खान
दिग्दर्शक -रेमो डिसोझा
संगीत -सलीम सुलेमान
कलाकार-सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, डेझी शहा, साकीब सलीम,फ्रेडी दारूवाला, निशिगंधा वाड, मिलिंद गुणाजी
रेटिंग – 1.5
– भूपाल पंडित
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button