breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांगाना कृत्रिम अवयवयांचा आधार

आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनतर्फे दिव्यांगाना अवयवाचे वाटप

पिंपरी – जूनी सांगवी येथे आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगाना कृत्रिम अवयवांचे वाटप  करण्यात आले. याप्रसंगी आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते दहा दिव्यांगाना कृत्रिम हात-पाय (जयपुर फुट) दिले आहे. तसेच दिव्यांगाना संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ दिला आहे. 

आमदार जगताप म्हणाले की, सामान्य जीवन जगण्यासाठी मनुष्याला निसर्गाने दिलेले सर्वच अवयव हवेत. दुर्दैवाने अनेकांना अपघात किंवा इतर काही कारणांमुळे हात, पाय यासारखे महत्त्वपूर्ण अवयव गमवावे लागतात. मनुष्याचे एक बोट जरी जायबंदी किंवा निकामी झाले, तरी दैनंदिन काम करताना अडचणी येतात. काही लोकांना तर अख्खा हात, पाय किंवा दोन्ही हात व पाय गमवावे लागतात. दिव्यांग व्यक्ती शरीराने अधू असल्या, तरी त्या मनाने कुठेही खचलेल्या दिसत नसतात. समाजातील अशा घटकांसाठी काही तरी करावे, या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप सोशल फाऊंडेशनकडून समाजातील पिडितांना मोफत मदत करत आहे. यावेळी भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास पाटिल, प्रमोद ताम्हणकर, अदिती निकम, आकाश वाघमारे आदि उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button