breaking-newsमनोरंजन
#CoronaVirus:सायली राजाध्यक्ष सांगतात, कोरोनाला घाबरू नका
मुंबई : ब्लॉगर सायली राजाध्यक्ष आणि त्यांचे पती यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. सायली राजाध्यक्ष यांच्याशी चोवीस तास डॉट कॉमने काही दिवसांपूर्वी ‘जगभर पसरलेल्या कोरोनाचा आढावा’ या विषयावर फेसबुक लाईव्ह केलं होतं. यावेळी सायली राजाध्यक्ष यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देशभरात पसरलेल्या कोरोनाचा अनुभव तेथील स्थानिकांकडून मागवला होता. या विषयांवर लाईव्हमध्ये चर्चा करण्यात आली होती.
२६ मे रोजी सायली राजाध्यक्ष यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे. कोरोनाशी दोन हात करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याचा अनुभव त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे. सायली राजाध्यक्ष आणि निरंजन राजाध्यक्ष कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या काळातील त्यांचा अनुभव म्हणून सायली राजाध्यक्ष यांनी पोस्ट शेअर केली आहेत.