breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रसिद्ध मॉडेलनं संपवलं जीवन, IPLमधील प्रसिद्ध खेळाडू अडचणीत

Taniya Singh | प्रसिद्ध मॉडेल तानिया सिंहने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. २८ वर्षाची तानिया फॅनश डिजायनिंग आणि मॉडलिंगच्या क्षेत्रात काम करायची. इन्स्टाग्रामवर तिचे १० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तपासात समोर आलय की, आयुष्य संपवण्याआधी तिने शेवटचा कॉल क्रिकेटपटूला केला होता. त्यामुळे IPLमध्ये खेळणारा एक नावाजलेला खेळाडू अडचणीत आला आहे.

तानियाच्या आत्महत्येनंतर अभिषेक शर्मा अडचणीत सापडला आहे. अभिषेक शर्मा हा इंड‍ियन प्रीम‍ियर लीग (IPL) मध्ये सनरायजर्स हैदराबाद कडून खेळतो. अभिषेक शर्मा हा तानिया सिंहच्या संपर्कात असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. सूरतच्या स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी त्याला समन पाठवलय.

हेही वाचा    –      Rajya Sabha Election | अशोक चव्हाण यांच्यासह ६ जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड 

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, तानियाच्या कॉल डिटेलमध्ये अनेक रहस्य आहेत. तिने शेवटचा कॉल सुद्धा अभिषेक शर्माला केला होता. जीवन संपवण्यामागे प्रेमसंबंध तर कारण नाही ना? या अँगलने पोलीस आता चौकशी करतायत.

अभिषेक आणि तानियाच्या मैत्रीबद्दल पोलिसांना तपासातून माहिती मिळणार आहे. मॉडल तान‍िया रात्री उशिरा घरी परतली. त्यानंतर तिने जीवन संपवलं. तानियाच्या कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button