breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

वर्षभरात भाजपचा विकास कुठे दिसेना – विरोधी पक्षनेते दत्ता सानेंची टीका

पिंपरी – महापालिकेतील सत्ताधारी भाजपने वर्षभरात राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्घाटने करुन स्वताःचा टेंभा मिरवला आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात एकही महत्वपुर्ण प्रकल्प भाजपने राबविलेला नाही. त्यामुळे त्यांनी विकास कामे करण्याएेवजी विविध कामांत काळेबेरे करुन करदात्यांच्या पैशांची लूट करीत स्वतःची घरे भरली आहेत. शहरात कचरा, पाणी प्रश्नांवरुन नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर उर्वरीत गोरगरींबाना घरे देण्याएेवजी त्यांना वंचित ठेवून जागा ताब्यात नसताना पंतप्रधान आवास योजना राबवू लागले आहेत. त्याच्या सगळा भांडाफोड पुराव्यानिशी करणार आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक डब्बू आसवानी, समीर मासूळकर, राहूल भोसले, नगरसेविका वैशाली घोडेकर, विनया तापकीर, सुमन पवळे आदी उपस्थित होते.

दत्ता साने म्हणाले की,  ”भाजपला वर्षभरात मुलभूत प्रश्न सोडविता आले नाहीत. कचरा, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी महापालिकेला स्वच्छतेचा ‘बेस्ट’ पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी कचरा संकलनाचे काम करणारी यंत्रणाच आजही काम करत आहे. तरीही, शहरात कच-याची समस्या उग्र झाली आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी कच-यात गुरफटले आहेत. पैसे खाण्यासाठी त्यांना कचरा देखील पुरला नाही. कच-याच्या किती निविदा काढाव्यात. किती नाही, हेच त्यांना समजेना झाले आहे”

तसेच महापालिका आयुक्त भाजपचे प्रवक्ते असून त्यांचाही भ्रष्टाचारात सामील आहेत, त्यांनी मागील काळात भाजप पदाधिका-यांना पैशा मिळवून देण्याचे काम केले. आयुक्तच भ्रष्टाचाराला पाठिशी घालत असल्याने वेळ प्रसंगी त्यांच्या बदलीचीही मागणी आम्ही करणार आहोत. महापालिकेच्या चुकीच्या कामात भाजपसह राष्ट्रवादीचे कुणीही सहभागी असतील, त्यांना भांडाफोड करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक असलेले नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेविका मंगला कदम यांच्या शहरातील पहिल्या फळीचे नेतेमंडळी दत्ता साने यांच्या पत्रकार परिषदेला उपसि्थत राहिलेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात अजूनही गटबाजी असल्याचे यावरुन दिसून आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button