Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे रविवारी पुरस्कारांचे वितरण

संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष समारंभ
 
पिंपरी  – अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. चिंचवडच्या उद्यमनगर येथील कामगार कल्याण मैदान येथे रविवारी (दि. 27) सायंकाळी साडेचार वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली आहे.
राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते विजय कदम, उद्योगपती ध्रुवशेठ कानपिळे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, नगरसेवक माधुरी कुलकर्णी, जयश्री गावडे, शीतल शिंदे, भाऊसाहेब भोईर, शैलेश मोरे आदी उपस्थित राहणार आहे.
 या वर्षी  माजी खासदार गजानन बाबर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे (कार्यक्षम नगरसेवक), मदन वाघमारे (उद्योगभूषण), विनायक भोंगाळे (पिंपरी-चिंचवड भूषण), अशोक भुजबळ (सहकार भूषण), राजेंद्र गोरे (युवा भूषण), नगरसेविका उषा वाघेरे (कार्यक्षम नगरसेविका) आदींना विशेष कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button