breaking-newsराष्ट्रिय

दिवाळी बोनस! हिरे व्यापाऱ्याने कर्मचाऱ्यांना दिल्या ६०० कार

दिवाळ सण आला की कर्मचा-यांना उत्सुकता लागते ती बोनसची. दिवाळी सणांत कर्मचा-यांना बोनस सोबत भेटवस्तूही दिल्या जातात. पण सूरतमधले प्रसिद्ध हिराव्यापारी सावजी ढोलकीया मात्र आपल्या कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस म्हणून सदनिका किंवा गाड्या देतात. दिवाळी आली की सावजी ढोलकिया चर्चेत येतात. यंदा दिवाळी भेट म्हणून त्यांनी आपल्या कार आणि एफडी गिफ्ट दिले आहे.

सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी दिवाळी भेट म्हणून आपल्या ६०० कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे तर ९०० कर्मचाऱ्यांना बँकेत एफडी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवर त्यांनी चक्क ५० कोटी रुपयांचा खर्च त्यांनी केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी कंपनीत २५ वर्षं पूर्ण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेन्झही भेट म्हणून देण्यात आली आहे. तर २०१६ मध्ये आपल्या १७६१ कर्मचा-यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिल्या होत्या. ‘हरे कृष्ण एक्सपोर्टचे’ चेअरमन असलेले सावजी यांनी २०१४ मध्ये देखील आपल्या कर्मचा-यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, सदनिका आणि दागिन्यांचे वाटप केले होते. २०१४ मध्ये सावजी यांनी १३०० कर्मचा-यांना गाड्या, दागिने देऊन खूश केले होते

कोण आहे सावजी ढोलकिया
‘हरे कृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे सावजी संस्थापक आहे. त्यांच्या कंपनीतून जवळपास ५० देशांमध्ये हि-यांची निर्यात जाते. हिरा व्यापारांमध्ये ते ‘सावजी काका’ या नावाने प्रसिद्ध आहेत. गुजरातच्या दुधारा गावातल्या शेतकरी कुटुंबात सावाजींचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षांत शाळा सोडल्यानंतर त्यांनी आपल्या काकाला हिरा व्यवसायात मदत करायला सुरूवात केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button