breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘हलका ताप आल्यानंतर कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मी स्वतःला अलगीकरणात ठेवले आहे. सध्या माझी प्रकृती ठीक असून मला ताप किंवा अन्य कोणताही त्रास होत नाहीये. तरी तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेने लवकरच पूर्ण बरा होऊन कामावर परतेन.’

दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मनीष सिसोदिया दिल्ली विधानसभा अधिवेशनात सहभागी होऊ शकले नाहीत. सोमवारी दिल्ली विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवण्यात आले होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केवळ एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button