breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २४ तासांत ८३ हजार ८०९ नवे रुग्ण

  • देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाखांवर

नवी दिल्ली – जगात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात दररोज 75 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता प्रचंड वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 83 हजार 809 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 1 हजार 54 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 49 लाख 30 हजार 237 वर पोहोचली आहे. लवकरच हा आकडा 50 लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 38 लाख 59 हजार 400 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 80 हजार 776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 9 लाख 90 हजार 61 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत देशात 5 कोटी 83 लाख 12 हजार 273 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button