TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबई शहरात व्हायरल तापाची साथ

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्ण-दमट तसेच पावसाळी थंड हवामानाने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. नवी मुंबई शहरातील महापालिका तसेच खासगी रुग्णालयात व्हायरल तापाची साथ पहावयास मिळत आहे. पालिका तसेच खाजगी रुग्णालयात ताप, सर्दी,खोकल्याने जडलेल्या रुग्णांत वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाशी महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालयात मागील आठवड्यात १००० ते १२०० बाह्य रुग्ण होते. परंतु सोमवारी पासून रुग्णांत वाढ झाली असून १६००हुन अधिक रुग्ण दाखल होत आहेत. शहरात व्हायर तापाने डोके वर काढले आहे.

मागील आठवड्यापासून कधी ऊन्ह , कधी ढगाळ वातावरण तर मध्येच अचानक पावसाच्या सरी बसरत आहेत .या वातावरणात संसर्ग पसरविण्याऱ्या जंतूना अधिक पोषकपूरक हवामान निर्मिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे हवेत रोग प्रसार करणाऱ्या जनतूंची प्रतिकार शक्ती वाढून त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. म्हणून हेवेमार्फत यांचे संसर्ग वाढले असून सर्दी, खोकला घसा दुखणे या आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पालिका तसेच खासगी रुग्णालयात तापाने बेजार झालेल्या रुग्णांची रीघ लागलेली पहावयास मिळत आहे.

महापालिका रुग्णालयात मागील आठवड्यात १०००-१२०० बाह्यरुग्ण होते परंतु या वातावरणातील हवामान बदलाने या आठवड्यात सोमवारपासून बाह्यरुग्णांत वाढ होत असून सोमवारी रुग्णालयात १६५० बाह्यरुग्ण तपासणी करण्यात आलेली आहे. अशी माहिती वाशी महापालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button