breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिलासा : देशात कोरोना व्हायरसची लागण झालेले 11 रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे

 जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे… मात्र यातच आता एक टेन्शन हलक करणारीही बातमी समोर आली आहे.देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 11 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून ते ठणठणीत बरेही झाल्याचं समोर आलं आहे… आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

संपूर्ण देशात आतापर्यंत 80 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 11 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. यात समावेश असलेल्या केरळातील 3 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जदेखील देण्यात आला आहे. लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार याशिवाय दिल्लीतील 7 आणि तेलंगानातील एकमात्र कोरोना बाधित रुग्णही बरा झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 65 भारतीय, 16 इटालीयन आणि एका कॅनाडाच्या नागरिकाचा समावेश आहे. यो कोरोना बाधितांच्या  संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 4,000 हून अधिक जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या शिवाय प्रमुख आणि छोट्या बंदरांवर एकूण 25 हजार 504 प्रवाशांची चाचणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लँडपोर्टवर 14 लाखाहून अधिक लोकांची चाचणी करण्यात आली, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button