breaking-newsराष्ट्रिय

दंतेवाडात चकमक महिला नक्षली ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त

छत्तीसगड मधील दंतेवाडा भागात झालेल्या चकमकीनंतर एका महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गुंडेरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली.

ANI

@ANI

Dantewada: Bodies of 2 Naxals recovered following an exchange of fire b/w Naxals & joint team of DRG&STF in Gonderas jungle in Aranpur police station area around 5 am today. One INSAS rifle&one 12 Bore weapon with ammunition & other incriminating materials recovered.

ANI

@ANI

Deputy Inspector General (anti-naxal operations) Sundarraj P issues a correction that only one body, of a female Naxal, was recovered following encounter in Dantewada today; says, “few more Naxals might have been hit, but we couldn’t recover their bodies”. pic.twitter.com/RbbXeu8VdO

View image on Twitter
१५ लोक याविषयी बोलत आहेत

अरणपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात बुधवारी पहाटे ५ वाजता सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली होती. नक्षलींच्या गोळीबारास  जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी जवानांच्या  गोळीबारात ठार झालेल्या एका महिला नक्षलीचा मृतदेह   ताब्यात घेण्यात आला . तसेच,  घटनास्थळावरून एक रायफल, १२ बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला . या कारवाईत अन्य नक्षलवाद्यांचा देखील खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्यांचे मृतदेह हस्तगत झाले नसल्याची माहिती नक्षलवाद विरोधी मोहिमेचे  पोलिस उपमहानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली आहे.   सुरक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. या कारवाईनंतर आसपासच्या परिसरातही जवानांची शोध मोहिम सुरूच आहे.

दंतेवाडात कार्यरत असलेल्या डीआरजीच्या एकमेव महिलांच्या तुकडीत ३० आत्मसमर्पण केलेल्या नक्षली महिला व शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्नींचा समावेश करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button