breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सर्वांसाठी घर आणि सर्वांपर्यंत विकास हाच संकल्प – खा. अमर साबळे

पिंपरी – देशातील गरीबी व रोजगाराचा प्रश्न सुटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध विकासाभिमुख योजना राबवित आहे. ‘2022 सालापर्यंत सर्वांसाठी घर आणि सर्वांपर्यंत विकास’ हा संकल्प घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. त्याअंतर्गत सरकारच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात आलेले नियोजन, संशोधन सर्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ‘व्हिजन महाराष्ट्र पुणे 2018’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन इंडीया या प्रकल्पाअंतर्गत ‘व्हिजन महाराष्ट्र पुणे 2018’ याप्रदर्शनाचे उद्‌घाटन खा. अमर साबळे यांच्या हस्ते चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे शुक्रवारी (दि. 3) करण्यात आले. यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या केंद्र सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

खासदार साबळे म्हणाले की, केंद्र सरकारने मागील चार वर्षात नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी संशोधन क्षेत्रात हजारों कोटींचा निधी दिला आहे. त्यातून अंतराळ तंत्रज्ञान, भूगर्भ शास्त्र, संरक्षण, शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, आहार, आयुर्वेद, कला, व्यापार, उत्पादन, विपणन क्षेत्रात झालेले संशोधन नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी युवक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

 

सर्वांसाठी मुक्त प्रवेश असणा-या या प्रदर्शनास विद्यार्थी, युवक, लघुउद्योजक, उद्योजक, कामगार, शेतकरी, ग्रामिण भागातील विविध सहकारी सोसायट्यांचे पदाधिका-यांनी भेट द्यावी. असे आवाहन समन्वयक मनी वशिष्ठ यांनी केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. रविवारी (दि. 5) दुपारी एक वाजता खा. साबळे यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ होऊन सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचा समारोप होणार आहे.

 

प्रदर्शनातील सहभागी स्टॉल्स

या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षक केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये आयुर्वेदिक, युनानी, होमिओपॅथी आणि योग उपचाराबाबत प्रदर्शित करण्यात आली आहे. केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, खादी ग्रामोद्योग विभागाचे आकर्षक हस्तकला, हातमाग, खादी उत्पादने यांचे स्टॉल, कयर बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, इस्त्रो – अंतराळ संशोधन व तंत्रज्ञान विभाग, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, सेल (स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया), एनआरडीसी (राष्ट्रीय संसाधन संरक्षण परिषद), डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन), केंद्रिय योग एवं प्राकुतिक चिकित्सा अनुसंधान परिषद, इंडियन कौन्सिल फॉर मेडीकल रिसर्च (आयसीएमआर), सीडब्लुसी (केंद्रिय जल आयोग), नॉर्थ इस्टर्न रिजन कम्युनिटी रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रोजेक्ट (एनसीआरसीओआरएमपी), एनआरडीसी (नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन), अन्न औषध विभाग, खादी व ग्रामोद्योग विभाग, दिव्यांग विभाग, जागो ग्राहक जागो, एनआयएफ (नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन), आयोग्य व आहार, स्किल डेव्हलपमेंट, महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र या विभागांचे मार्गदर्शन करणारे माहितीपुर्ण स्टॉल उभारण्यात आले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button