breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत बरसल्या पावसाच्या सरी, मुंबईकर सुखावले

मुंबई|महाईन्यूज|

महाराष्ट्रात पुणे- मुंबईसह अनेक भागांत पावसाचं आगमन झालं आहे. मु्ंबईत तर काल पासून म्हणजे 31 मे पासूनच पावसाला सुरवात झाली आहे.आजही मुंबईत पहाटेच पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईकरांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामानात सुद्धा बदल होऊन थंडावा पसरला आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी पाऊस पडल्याचे दिसुन आले. हवामान खात्याने येत्या 2 किंवा 3 जून पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली होती. तर येत्या 7 जून पर्यंतच्या हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईतील पावसाचे फोटो आणि व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. मात्र सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मुंबईकर असो वा अजून कोणी सर्वांनाच   यंदा पावसाचा आनंद हा घर बसल्याच घ्यावा लागणार आहे.

येत्या 2 -3 दिवसात पश्चिम किनार पट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.तसेच नागरिकांसह यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत मच्छिमारांना सुद्धा पुढील 4 दिवस समुद्रात न जाण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button