breaking-newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमुंबई

‘त्या’ व्हीडिओतील काकुंवर हसणाऱ्या नेटिझन्सना अभिनेता स्वप्नील जोशीने फटकारले…काय म्हणाला वाचा!

पुणे । प्रतिनिधी

‘घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहे. १८०० रुपयांच्या हिशोबावरुन संबंधित काकू काही मुलांसोबत वाद घालत आहेत. मात्र, त्यांना १५००+ ३०० रुपयांचा हिशोब लक्षात येत नाही, असा तो व्हीडिओ आहे.

यावर सोशल मीडियावर संबंधित काकूंना नेटिझन्सनी हशा उडवला आहे. यावर संतापलेल्या अभिनेता स्वप्नील जोशी याने नेटिझन्सला फटकारले आहे. स्वप्नील जोशी म्हणाला आहे की, …त्यांचा फक्त पैशांचा हिशोब चुकलाय हो…आपल्या पैकी अनेकांचा आयुच्याचा हिशोब चुकलाय !!! मग आपण स्वतःवर किती हसलं पाहिजे!??

महिलांचा सन्मान केला पाहिजे, असाच संदेश स्वप्नीलने आपल्या ट्वटीटच्या माध्यमातून दिला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर १८०० रुपयांच्या पैशांवरून एका घरकाम करणाऱ्या काकूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरूवातीला हा व्हिडिओ मजेशीर वाटला तरीही महिलांच साक्षरतेचा प्रश्न यातून समोर आला आहे. घरकाम करणाऱ्या स्त्रिया या सामाजिक घटकातील महत्वाचा भाग आहे. पण या स्त्रियांच्या अशिक्षितपणामुळे त्यांचे नुकसान होत असल्याचं पुढे आलं आहे. महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button