breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तिपदाची न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली शपथ

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज, मंगळवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनमधील छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आदींसह उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अमजद सय्यद, न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्यासह काही न्यायमूर्ती तसेच अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वांनीच तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत समारंभात सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button