breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘त्या’ गुन्ह्यातून पिंपरी महापालिका जनसंपर्क अधिका-याची निर्दोष मुक्तता

किरण गायकवाड यांचा पालिका सेवेत रुजू होण्यासाठी अर्ज

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याविरुध्द संगमनेरमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. परंतु, त्या गुन्ह्यातून गायकवाड यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा महापालिका सेवेत रुजू करून घेण्यासाठी अर्द केला आहे.

महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याविरुध्द नाशिकच्या संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या अनैतिक संबधातून एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात किरण गायकवाड यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंद होता. दरम्यान, गायकवाड यांना संगमनेर सत्र न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2019 रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.

बहुचर्चित या प्रकरणानंतर किरण गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, गायकवाड 2013 पासून पालिका सेवेतून निलंबित आहेत. त्यांच्यामुळे पालिका जनसंपर्क अधिका-याचा कारभार प्रभारी अधिकारी अण्णा बोदडे चालवत होते. न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा गायकवाड यांची या पदावर वर्णी लागणार आहे.

किरण गायकवाड यांची संबधित फौजदारी गुन्ह्यातून  निर्दोष मुक्तता झाल्याचे कळविण्यात आले आहेत. तसेच, गायकवाड यांनी देखील पालिका सेवेत रूजू करून घेण्याकरिता अर्ज केला आहे. परंतु, वरिष्ठ न्यायालयातील प्रक्रियेची माहिती घेऊन त्यांच्या अर्जावर कार्यवाही केली जाईल.
– मनोज लोणकर, सहायक आयुक्त, प्रशासन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button