breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

… तर आरपीएफ देणार महिलांना ‘होम ड्रॉप’

मुंबई | महाईन्यूज

कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी निरनिराळी पावलं उचलण्यात येत आहे. यानुसार आता आरपीएफचे जवान आवश्यकता असल्यास संबंधित महिलेला घरापर्यंत सोडण्यासाठी येणार आहेत. नागपूरनंतर मुंबईत मध्य रेल्वेच्या पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षेसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री उशिरा आवश्यकता भासल्यास पोलीस होम ड्रॉप देणार असल्याची सुविधा नागपूरमध्ये सुरू करण्यात आली आहे. याच धर्तीवर आता मुंबईत मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यकता भासल्यास होम ड्रॉपची सुविधा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आरपीएफचे काही जवान तैनात करण्यात येणार आहेत. हे जवान महिलांना सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत ही सुविधा मिळणार आहे. यासाठी १८२ हा क्रमांक सुरू करण्यात आला असून यावर कॉल करून महिलांना आरपीएफच्या जवानांची मदत घेता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button