breaking-newsपुणे

तृप्ती देसाईंचे चारित्र्यहनन केल्याने तक्रार दाखल

सांगली – ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख आणि त्यांच्या समर्थकांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि तृप्ती देसाईंचे चारित्र्यहनन केल्याप्रकरणी राज्यातील पहिली तक्रार सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. भुमाता ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मीनाक्षी शिंदे यांनी 19 फेब्रुवारी 2020 रोजी ही तक्रार दाखल केली आहे.

सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकरांवर भुमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणावरुन इंदोरोकरांच्या समर्थकांनी देसाई यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती.

तृप्ती देसाई यांना अश्लील शिवीगाळ, ठोकून काढण्याची धमकी तसेच कपडे काढून मारण्याची धमकी इंदोरीकर समर्थकांकडून देण्यात आली आहे. तृप्ती देसाई या प्रतिष्ठित असून त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

तृप्ती देसाई या ख्रिश्चन धर्माच्या नसताना त्या ख्रिश्चन असल्याचं सांगत त्यांची बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचंही तक्रारीत म्हणण्यात आलं आहे. दरम्यान, इंदोरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांच्यातील वाद चांगलाच पेटताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button