breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
राधाकृष्ण विखे पाटील लवकरच महाविकास आघाडीत दिसतील
अहमदनगर – भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे ते लवकरच महाविकास आघाडीत आल्याचं दिसतील, असं मोठं वक्तव्य नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.
नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे हेही उपस्थिती होते. मुश्रीफांच्या वक्तव्यावर सुजय यांनी केवळ स्मीतहास्य केलं.
मुश्रीफ यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना आपलं सरकार येईल याची खात्री होती. मात्र, तसं न झाल्याने त्यांनी महाविकास आघाडीवर टीका सुरु केली आहे, असं ते म्हणाले आहेत.