breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

एकाच वेळी ५०० डॉक्टरांचा भाजपमध्ये प्रवेश; गुजरात निवडणुकीआधी घडामोडींना वेग

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीला (Gujrat Assembly Elections 2022) काही महिने बाकी असताना सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि ‘आप’ने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे मोठे नेते गुजरातमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असून रणनीती आखत आहेत. अशातच रविवारी भाजपने अनोखी खेळी खेळत ५०० डॉक्टरांना पक्षात खेचण्यात यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गांधीनगर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

गुजरातमध्ये जवळपास मागील तीन दशकांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हार्दिक पटेल आणि इतर तरुण नेत्यांना सोबत घेत भाजपसमोर चांगलंच आव्हान निर्माण केलं होतं. त्यामुळे यंदा होणाऱ्या निवडणूक रिंगणात आणखी ताकदीने उतरण्याचा निर्धार भाजप नेतृत्वाने केला आहे. या पार्श्वभूमीवरच तब्बल ५०० डॉक्टरांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. ‘वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी पुढील सहा महिने कोणतीही सुट्टी न घेता मेहनत करावी,’ अशा सूचना प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी दिल्या आहेत.

  • मोदी-शहांचं गृहराज्य आणि विरोधकांचं आव्हान

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं गुजरात हे गृहराज्य आहे. त्यामुळे या राज्यातील विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दुसरीकडे, भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये ‘रोड शो’ करत शक्तीप्रदर्शन केलं. तसंच काँग्रेसनेही पदाधिकाऱ्यांची बैठक घेत डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button