breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शरद पवारांचं ते वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं- विश्व हिंदू परिषद

पिंपरी |महाईन्यूज|

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मशिदीसाठी न्यासाची स्थापना करण्याची केलेली मागणी म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी असल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांड यांनी केली आहे.

शरद पवारांसारख्या जबाबदार नेत्याने असं बेजबाबदार वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं असल्याचं परांड यांनी म्हंटलं आहे. पवार यांनी मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना का करण्यात आली नाही? असा सवाल केला. सरकारने अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असं पवारांनी म्हटलं होतं.

दरम्यान, वारिस पठाण यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे धमकी आहे. त्यांनी भारताचा इतिहास अभ्यासावा आणि आपलं तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकवण्याचे चांगले परिणाम होणार नाहीत, असा इशारा विश्व हिंदू परिषदचे मिलिंद परांडे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button