breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

पुणे |महाईन्यूज|

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास विठ्ठलराव बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मागील आठवड्यात मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या भावावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सदर प्रकरणात त्यांना न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केलेला असताना बुधवार (दि.26) चौकशीसाठी बांदल यांना शिक्रापूर पोलीस स्टेशनला बोलविण्यात आले.

पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अटक केली. मात्र, अटक केल्यानंतर तातडीने शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मंगलदास बांदल यांना शिरूर पोलीस स्टेशनच्या कोठडीत रवाना केले आहे. यानंतर सायंकाळी पोलिसांनी प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, फिर्यादी दत्तात्रय मांढरे यांच्याशी बांदल यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून पैशाची खूप गरज आहे, असे सांगून फिर्यादीच्या नावावर खोटे खरेदी प्रत करून त्याआधारे पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतून आठ लाख रुपये कर्ज प्रकरण करून ते आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आहे. पुन्हा सदर मिळकतीवर कब्जा करता फिर्यादीचे कुलमुखत्यार पत्र व बनावट पुरवणी दस्त तयार करून पुन्हा फिर्यादीच्या संमतीशिवाय शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेकडून 1 कोटी 25 लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतःच्या फायद्याकरता वापरले.

या कर्जाचे हप्ते न भरल्याने 2 कोटी 50 लाख रुपये थकबाकी केली. सदर गुन्ह्याच्या तपास कामी मंगलदास बांदल यांना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करत आहेत. अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button