breaking-newsताज्या घडामोडीपुणे

तहसीलदाराने शेतकऱ्याला ठोठावला तब्बल साडेसहा कोटींचा दंड

पुणे महाईन्यूज

हवेली तालुक्यात जमिनीच्या किमतीपेक्षाही अधिक दंड ठोठावल्याचा प्रताप समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या 4 एकर 17 गुंठे जमिनीवर वाळू उपसा केल्याप्रकरणी सुमारे 6 कोटी 57 लाख 32 हजार 913 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हवेली तालुक्यातील जेमतेम 1870 लोकसंख्या असलेल्या बुर्केगावच्या सर्वसामान्य कुटुंबातील धोंडीबा मारुती वाघमोडे हे शेतकरी आपली शेती कसून आपली उपजीविका करतात. वाघमोडे यांची परिस्थिती ही हालाकीची असल्याने त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून सन 2019 ते 2019 या काळात घरकुल मंजूर झाले आणि त्यांना हे घरकुल बांधण्यासाठी वाळूची आवश्यकता असल्याने त्यांनी आपल्याच शेतात वाळू काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हाच निर्णय आता त्यांच्या अंगलट आला असून त्यांना हवेली तहसिलदारांनी अनधिकृत गौणखनिज उत्खनन केल्याबाबत 6 कोटी 57 लाख 32 हजार 913 रूपयांचा दंड ठोठावला आहे.

तर हवेलीचे तहसीलदार सुनिल कोळी यांना याबाबत विचारले असता, नको त्या बाबतीत प्रश्न विचारू नका. माझ्या कार्यकाळात इतक्या मोठ्या प्रकारचा दंड ठोठावला गेला नसल्याचे त्यांनी सांगितले. माञ दंडाच्या वसुलीसाठी पाठवलेल्या नोटीसावर माञ सुनिल कोळी यांची सही दिसत आहे. एकीकडे वाळूमाफीया मोकाट फिरत असून बेसुमार वाळू उपसा करत असताना, एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड करने चुकीचे असल्याचे शिरूर हवेलीचे लोकप्रतिनीधी आमदार अशोक पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. तर हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे अपील करावे निश्चित त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button