breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना ED विरोधात आक्रमक, महिला पदाधिकारी 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता

मुंबई – प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही सक्तवसूली संचलनालय अर्थात EDची नोटीस आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ED विरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची 5 जानेवारीला ED कडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ED कडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेनं आता ED विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button