breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ

नवी दिल्ली | महाईन्यूज

सामान्य ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. सर्व महानगरांमध्ये घरगुती इण्डेन गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ घोषित करण्यात आली आहे. इंडियन ऑइलने विनाअनुदानित १४ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रूपयांपासून १४९ रूपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. ही वाढ आजपासून लागू झाली आहे. याआधी १ जानेवारी २०२० पासून घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ घोषित करण्यात आलेली होती.

या दरवाढीमुळे मुंबईत आता विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना ८२९.५० रूपये मोजावे लागणार आहेत. मुंबईत गॅसच्या किंमतीत १४५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच राजधानी दिल्लीत सिलिंडरच्या किंमतीत १४४.५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आता १४ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी ८५८.५० रूपये मोजावे लागणार आहेत. दरवाढीनंतर कोलकातामध्ये नागरिकांना १४९ रूपये जास्त मोजून ८९६ रूपयांना गॅस सिलिंडर विकत घेता येईल, तर चेन्नईमध्ये १४७ रूपयांच्या वाढीसह गॅस सिलिंडरचे दर ८८१ रूपयांवर पोहोचलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button